पाहा Video : 'समांतर 2' मधून पुन्हा निमा महाजनच्या भूमिकेतून लक्ष वेधणार अभिनेत्री तेजस्विनी पंडित, पाहा खास मुलाखत

By  
on  

समांतर या वेब सिरीजचं दुसरं सिझन लवकरच प्रदर्शित होत आहे. समांतर 2 च्या निमित्ताने अभिनेत्री तेजस्विनी पंडितसोबत पिपींगमून मराठीने खास बातचीत केली आहे. यावेळी निमा महाजनच्या भूमिकेविषयी तेजस्विनीने सांगितलं. मोठ्या प्रोजेक्टचा छोटा भाग असणंही महत्त्वाचं असल्याचं ती सांगते.

या सिरीज दुसर्या सिझनच्या निमित्ताने तेजस्विनी पुन्हा एकदा स्वप्नील जोशी सोबत झळकतेय. खऱ्या आयुष्यात स्वप्नील आणि तेजस्विनी यांची चांगली मैत्री असल्याने ऑनस्क्रिन केमिस्ट्री उत्तम दिसत असल्याचं ती सांगते. तेजस्विनीने आत्तापर्यंत मालिका, चित्रपट आणि विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून विविध भूमिका साकारल्या आहेत. प्रत्येक भूमिका या वेगळ्या होत्या. त्यामुळे आगामी काळातही सातत्याने वेगलं काही करण्याची तेजस्विनीची इच्छा आहे. 

Recommended

Loading...
Share