PeepingMoon Exclusive : "दिलीप कुमार हे मेहनती आणि प्रामाणिक कलाकार होते", प्रेम चोप्रा यांनी आठवणींना दिला उजाळा.. पाहा व्हिडीओ

By  
on  

लोकप्रिय ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीत शोकाकुळ वातावरण आहे. विविध क्षेत्रातील मान्यवर आणि कलाकार दिलीप कुमार यांना अखेरचा निरोप देण्यासाठी आणि श्रद्धांजली वाहण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचले आहेत. तर काहींनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली आहे. 

प्रसिद्ध अभिनेते प्रेम चोप्रा यांनी देखील दिलीप कुमार यांना श्रद्धांजली वाहत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. प्रेम चोप्रा यांच्यासाठी दिलीप कुमार हे प्रेरणास्थान होते. दिलीप कुमार सारखं बनण्याचं स्वप्न घेऊन तेही मुंबईला आले होते. प्रेम चोप्रा यांचे वडीलही त्यांना दिलीप कुमार सारखे अभिनेते बनण्याचा सल्ला देत असे. पिपींगमूनने नुकतच प्रेम चोप्रा यांच्यासोबत संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी दिलीप कुमार यांच्यासोबतच्या अनेक आठवणी सांगितल्या आहेत.

'दास्तान' या चित्रपटातून प्रेम चोप्रा यांना दिलीप कुमार यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली होती. त्यानंतर अनेक सिनेमांमध्ये ते दिलीप कुमार यांच्यासोबत झळकले. दिलीप कुमार हे अतिशय मेहनती आणि प्रामाणिक अभिनेते असल्याचं ते सांगतात. शिवाय सेटवर त्यांचा वावर एखाद्या शिक्षकासारखा असायचा. त्यांच्यामुळे अनेक कलाकारांना अभिनयातील विविध गोष्टी शिकायला मिळत असल्याचही प्रेम चोप्रा सांगतात.

 

Recommended

Loading...
Share