Exclusive : या कलाकारांनी तयार केलं Friends न पाहिलेल्या माणसाचं खंत गीत, 'आसोवा' टीमसोबत गप्पा

By  
on  

'फ्रेंड्स' या मालिकेचे असंख्य चाहते जगभरात आहेत. भारतातही या मालिकेचा मोठा चाहतावर्ग आहे. मात्र काही व्यक्ति अशाही आहेत ज्यांनी फ्रेंंड्स कधीच पाहिलेलं नाही. मग अशाच फ्रेंड्स न पाहिलेल्या माणसावर 'आसोवा' म्हणजेच 'आपली सोसल वाहिनी' या नव्या चॅनेलने खास व्हिडीओ केलाय. आणि लवकरच ही वाहिनी 'फ्रेंड्स' न पाहिलेल्या माणसाचं खंत गीतही घेऊन येत आहेत. हे खास गाणं आसोवाच्या टीमने पिपींगमून मराठीसोबत एक्स्लुझिव्ह शेयर केलय.

'आसोवा' या युट्यूब चॅनेलचा सर्वेसर्वा समीर खांडेकर, अभिनेत्री पल्लवी पाटील आणि त्यांच्या टीमने यावेळी आसोवाचं वैशिष्ट्य सांगितलं. याशिवाय अनेक कलाकार आगामी काळात या वाहिनीसोबत विविध व्हिडीओ करताना दिसणार आहेत. आत्तापर्यंत या वाहिनीचे तीन व्हिडीओ प्रदर्शित झाले असून आसोवाला नेटकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. 

Recommended

Loading...
Share