पाहा Video : प्राजक्ता माळीची ही आहे खास इच्छा, काव्यसंग्रह प्रकाशनाच्या निमित्ताने खास गप्पा

By  
on  

अभिनेत्री प्राजक्ता माळी ही एक उत्तम नृत्यांगना, सूत्रसंचालक म्हणून ओळखली जाते. नुकतीच प्राजक्ताची एक नवी ओळख आता निर्माण झाली आहे. प्राजक्ता आता यापुढे कवयित्री म्हणूनही ओळखली जाणार आहे. नुकतच प्राजक्ताने तिच्या प्राजक्तप्रभा या काव्यसंग्रहाचं प्रकाशन केलय. यावेळी अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा प्रकाशन सोहळा पार पडला. यावेळी पिपींगमून मराठीने प्राजक्तासोबत संवाद साधला आहे. 

यावेळी प्राजक्ताने या काव्यसंग्रहाविषयी सांगितलं. या काव्यसंग्रहात मराठीसह काही हिंदी आणि इंग्रजी कवितांचाही समावेश आहे. म्हातारपणी स्वत:वर बायोपीक होण्याची इच्छा असल्याचं यावेळी प्राजक्ताने सांगितलं. आयुष्यात आत्तापर्यंत आलेले अनुभव प्राजक्ताने लेखणीतून काव्यरुपात उतरवले आहेत. अध्यात्म आणि योगची या सगळ्या प्रवासात मोठी मदत झाली असल्याचही ती सांगते. 

Recommended

Loading...
Share