पाहा Video : अभिनत्री गौरी किरण सांगतेय स्वराज्यजननी जिजामाता मालिकेत काम करण्याचा अनुभव

By  
on  

अभिनेत्री गौरी किरण ही स्वराज्यजननी जिजामाता या मालिकेत महाराणी सोयराबाईंची भूमिका साकारतेय. या मालिकेचे नुकतेच 500 भाग पूर्ण झालेत. गौरीने आत्तापर्यंत काम केलेल्या एखाद्या मालिकेचे 500 भाग पूर्ण होणं हे तिच्या बाबतीत पहिल्यांदाच घडत असल्याचं सांगतेय. नुकतच पिपींगमून मराठीने गौरीसोबत खास बातचीत केलीय. यावेळी तिने महाराणी सोयराबाईंची भूमिका साकारण्याचा अनुभव शेयर केलाय. 

या मालिकेत अभिनेत्री नीना कुळकर्णी, डॉ. अमोल कोल्हे यांसारखे अनुभवी कलाकार असल्याने या कलाकारांकडून बरच काही शिकायला मिळत असल्याचं ती सांगते. शिवाय प्रत्येक प्रोजेक्टच्या निमित्ताने अनेक अनुभवी कलाकारांसोबत काम करण्याचा योग आल्याचं ती सांगते.

Recommended

Loading...
Share