By  
on  

पाहा Video : हिंदीतील ही प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिका मराठी रिएलिटी शोमध्ये बनली कॅप्टन, खास बातचीत

'मी होणार सुपरस्टार - जल्लोष डान्सचा' या डान्स रिएलिटी कार्यक्रमाची सर्वत्र चर्चा सुरु आहे. अभिनेता अंकुश चौधरी या कार्यक्रमाचा परिक्षक आहे तर वैभव आणि कृती महेश हे प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक या कार्यक्रमात कॅप्टन म्हणून दिसतील. या कार्यक्रमाच्या निमित्ताने पिपींगमून मराठीने कॅप्टन कृती महेशसोबत गप्पा मारल्या आहेत. यावेळी तिने कॅप्टन म्हणून काम करण्याचा अनुभव शेयर केलाय. 

कृती ही डोंबिवलीत वाढलेली असल्याने ती उत्तम मराठी बोलत असल्याचं यावेळी म्हटलीय. सगळ्या स्पर्धकांचे परफॉर्मन्स उत्तम होण्यासाठी कॅप्टन म्हणूनही मेहनत घेत असल्याचं ती म्हटलीय. शिवाय या मंचावरील परफॉर्मन्समध्ये आंतरराष्ट्रीय डान्सचा दर्जा पाहायला मिळणार असल्याचं कृती म्हणाली.

Recommended

PeepingMoon Exclusive