By  
on  

पाहा Video : माधुरी आली माहेरी.. एकाच मंचावर दिसली मराठी कलाकारांसोबत

धकधक गर्ल माधुरी दीक्षित कोणत्याही कार्यक्रमात असेल तर सगळ्यांचं लक्ष तिच्याकडेच असतं. याची प्रचिती आली ती प्लॅनेट मराठी ओटीटी प्लॅटफॉर्मच्या लाँच सोहळ्यात. यावेळी माधुरीच्या हस्ते हा लाँच सोहळा पार पडला. यावेळी अनेक मराठी कलाकारही या सोहळ्यासाठी उपस्थित होते. आगामी काळात मराठीसाठीही विविध काम करण्याची इच्छा असल्याचं माधुरीने सांगितलय. मराठीच्या हक्काच्या ओटीटी प्लॅटफॉर्म आणण्यासाठी माधुरीने अक्षय बर्दापुरकर यांचे आभार मानले आणि या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी उपस्थित मराठी कलाकारांचा माधुरीच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, अमृता खानविलकर, प्राजक्ता माळी, सोनाली खरे, दीप्ति देवी, सुशांत शेलार, सायली संजीव यासह अनेक कलाकार उपस्थित होते.

Recommended

PeepingMoon Exclusive