By  
on  

पाहा Video : "मी जसा आहे तसाच त्या घरात राहिलो", आदिश वैद्यने शेयर केला बिग बॉस मराठीचा अनुभव

बिग बॉस मराठी 3 मध्ये पहिला वाईल्ड कार्ड स्पर्धक होता आदिश वैद्य. आदिश हा तब्बल दोन आठवड्यातच एलिमिनेट होऊन बिग बॉस मराठीच्या घराबाहेर गेला. आदिशला त्या घरात आणखी खेळ खेळायचा होता मात्र तसं न होता तो दोन आठवड्यात बाहेर पडल्याने त्याने नाराजी व्यक्त केली आहे. मात्र प्रेक्षकांचं आणि चाहत्यांच भरभरुन प्रेम मिळाल्याने तो आनंदी आहे. पिपींगमून मराठीने नुकताच आदिशसोबत संवाद साधलाय. यावेळी त्याने बिग बॉस मराठीच्या घरातील अनुभव शेयर केलाय.

"मी जसा आहे तसाच त्या घरात राहिलो" असं यावेळी आदिश म्हटलाय. जय दुधाणेसोबत आदिशचे खटके उडताना दिसले होते.यावर आदिश म्हटला की,  "जय विषयी मी कोणतीच पर्सनल कॉमेंट केली नव्हती. बाहेर आल्यानंतर जयसोबत बाहेर बोलणं होईल असं वाटत नाही. आमची मतं फार वेगळी आहेत." याशिवाय त्याचे इतर स्पर्धकांसोबतचे मतभेद, बिग बॉसच्या घरातील प्रवास, टास्क या सगळ्यावर आदिश बोलता झाला.

Recommended

PeepingMoon Exclusive