By  
on  

पाहा Video : दरवर्षी एक मराठी चित्रपट घेऊन येण्याची सुभाष घईंची इच्छा, 'विजेता'च्या निमित्ताने गप्पा

शोमॅन म्हणून ओळख असलेले दिग्दर्शक, निर्माते सुभाष घई हे 'विजेता' या मराठी चित्रपटाचे प्रेझेंटर आहेत. मागील वर्षी हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर लॉकडाऊन घोषीत झाला होता. मात्र आता यावर्षी पुन्हा हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आलाय. हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित न करता मोठ्या पडद्यावर प्रदर्शित करण्याची सुभाष घईंची इच्छा होती. या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान पिपींगमून मराठीने सुभाष घईंसोबत खास बातचीत केलीय. यावेळी त्यांनी मराठी चित्रपटांविषयीचं त्यांचं प्रेम आणि 'विजेता' याविषयी सांगितलं. 

शिवाय प्रत्येक वर्षी एक किंवा दोन मराठी चित्रपट ते घेऊन येणार असल्याचं सांगितलं. हिंदीतही सुभाष घई विविध चित्रपट घेऊन असल्याचं यावेळी ते बोलले. शिवाय रिमेक चित्रपटांबद्दल त्यांचं मत व्यक्त केलं. त्यांच्या 'ताल' या चित्रपटाचा रिमेक होणं शक्य नसल्याचं सांगितलं. जर 'ताल'चा रिमेक झाला तरी तो वेगळा असेल असं ते म्हटले.

Recommended

PeepingMoon Exclusive