By  
on  

पाहा Video : '83' च्या निमित्ताने संदीप पाटील यांनी जागवल्या आठवणी, आदिनाथ आणि चिरागने सांगितला अनुभव

83 हा चित्रपट 1983 मध्ये भारताने पहिल्यांदाच जिंकलेल्या क्रिकेट विश्वचषक सामन्याची कथा आहे. नुकताच हा चित्रपट प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद या चित्रपटाला मिळतोय. क्रिटिक्टकडून पसंतीची पावती मिळाल्यानंतर आता प्रेक्षकांकडून या चित्रपटाचं कौतुक होतय.

या चित्रपटात मराठमोळे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. अभिनेता आदिनाथ कोठारे हा क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर यांची भूमिका साकारतोय. तर अभिनेता चिराग पाटील हा त्याची वडिल प्रसिद्ध क्रिकेटपटू संदीप पाटील यांची भूमिका करतोय. यानिमित्ताने पिपींगमून मराठीने आदिनाथ आणि चिराग यांचा अनुभव जाणून घेतलाय. यावेळी संदीप पाटील यांनी देखील विश्वचषक सामन्याच्या आठवणी शेयर केल्या आहेत. यावेळी संदीप पाटील म्हणतात की, "आम्ही त्यावेळी जेवढी मेहनत घेतली होती त्यापेक्षा कित्येक पटीने या कलाकारांनी या चित्रपटासाठी मेहनत घेतली आहे."

Recommended

PeepingMoon Exclusive