
सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतील प्रत्येक पात्र लक्षवेधी ठरलय. मात्र सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं ते या मालिकेतील खलनायिकेने. अभिनेत्री माधवी नीमकर ही या मालिकेत खलनायिकेच्या भूमिकेत दिसतेय. सुरुवातीपासूनच या मालिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली, शिवाय या मालिकेतील विविध पात्रे ही त्यांना आवडली. यापैकीच एक पात्र म्हणजे शालिनी वहिनीचं. नुकत्याच झालेल्या धुमधडाका 2022 या कार्यक्रमात माधवी उर्फ शालिनी वहिनीने हजेरी लावली होती. यावेळी माधवीने मागील वर्ष तिच्यासाठी कसं गेलं याविषीय सांगितलं. शिवाय मालिकेला मिळालेल्या प्रेमासाठी प्रेक्षकांचे आभार मानले आहेत.