पाहा Video : 'आई मायेचं कवच' मालिकेविषयी भार्गवी म्हणते, "मालिकेतून आजच्या परिस्थितीचा आरसा निर्माण केलाय..."

By  
on  

आई आणि तिची माया या विषयावर सध्या विविध मालिका पाहायला मिळत आहेत. मात्र आई मायेचं कवच या मालिकेतून समाजातील सत्य परिस्थिती समोर आणण्याचा प्रयत्न केला गेलाय. या मालिकेतून अभिनेत्री भार्गवी चिरमुले आईच्या भूमिकेत दिसतेय.या मालिकेतून आई - मुलीच्या नात्याची एक वेगळी कथा पाहायला मिळतेय.

पिपींगमून मराठीने नुकताच भार्गवीशी या मालिकेविषयी संवाद साधलाय. यावेळी मालिकेविषयी भार्गवी म्हणते की, "आजकाल समाजात काय सुरु आहे, आपली मुलं काय करत आहेत, मुलांचं पालकांसोबतचं नातं हे खूप बदललय. त्याचे पडसाद कुठेतरी नात्यांमध्ये पडायला लागलेत. प्रत्येक घरात असं घडत असेल असं अजीबातच नाही. पण ज्या घरांमध्ये हे घडत असेल त्यांना यातून काहीतरी शिकता येईल. जिथे असं घडत नसेल त्यांना आजूबाजुला काय घडतय याची चाहुल तरी लागले."

 

Recommended

Loading...
Share