
तुमची मुलगी काय करते या मालिकेतून अभिनेत्री मधुरा वेलणकर साटम प्रेक्षकांची मनं जिंकतेय. तब्बल १२ वर्षांनी मालिका विश्वात कमबॅक करताना आधीपासूनच काहीतरी वेगळं करण्याची इच्छा असल्याचं मधुरा यावेळी पिपींगमून मराठीसोबतच्या मुलाखतीत म्हटलीय. शिवाय तिच्या करियरमध्ये कुटुंबाची आणि पतीची असलेली साथ फार मोलाची असल्याचं ती सांगते. इतक्या वर्षांनी मालिका विश्वात काम करताना मालिका क्षेत्रात झालेले अनेक बदल जाणवत असल्याचही ती सांगते.