पाहा Video : फिटनेस सिक्रेट सांगतोय 'डॉक्टर डॉन' फेम अभिनेता देवदत्त नागे

By  
on  

संपूर्ण महाराष्ट्रात आणि मुंबईत दिवसेंदिवस करोना रुग्णांच्या संख्येत भर पडतेय. परिस्थिती गंभीर होत चालली आहे. हे गांभिर्य जाणून घेत प्रत्येकाने आहे तिथेच घरात थांबून सुरक्षित रहावं व करोनाचा प्रादुर्भाव रोखावा.आज सर्वच दैनंदिन कामं ठप्प आहेत फक्त जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा तेवढा सुरळीत सुरु आहे.या काळात लाडके सेलिब्रिटी कसे आपलं रुटीन फॉलो करतायत हे आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करतोय. 

मागच्या आठवड्यात डॉक्टर डॉन फेम अभिनेता देवदत्त नागे पिपींगमून मराठीच्या खास लाईव्ह सेशनमध्ये सहभागी झाला होता. देवदत्त खुप फिटनेस फ्रीक आहे, हे तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही. देवदत्त निसर्गरम्य अलिबाग येथे राहतो.  लॉकडाऊन काळात तो त्याच्या घरी आहे. जीम बंद असल्या तरी घरच्या घरी कसं फिट राहायचं, मानसिक स्वास्थ्यासाठी आपल्याला आवडणा-या गोष्टी कशा आवर्जुन करायच्या आणि तानाजी द अनसंग वॉरियर सिनेमातल्या अविस्मरणीय आठवणींना देवत्तने यावेळी सांगितल्या. 

Recommended

Loading...
Share