By  
on  

पाहा Video : अभिनेता सिध्दार्थ जाधवने सांगीतलं 'टेड टॉक'मध्ये मराठीत बोलण्याचं कारण

अभिनेता सिध्दार्थ जाधवने आत्तापर्यंत विविध भूमिका साकारल्या आहेत. नाटक, सिनेमे आणि रिएलिटी शो अशा त्याच्या प्रवासात त्याने विविध गोष्टी केल्या आहेत. मात्र नुकतच सिध्दार्थ हा टेड टॉक शोमध्येही दिसला. प्रेरणादायी प्रवास आणि अनुभव या ठिकाणी शेयर केले जातात. अभिनेता सिध्दार्थनेही त्याच्या टेड टॉकमधून त्याचा प्रेरणादायी प्रवास शेयर केला. मात्र यावेळी तो मराठीत बोलला. त्याच्या चाहत्यांपर्यंत त्याचं हे बोलणं नीट पोहोचावं यासाठीचा हा त्याचा प्रयत्न होता. नुकत्याच दिलेल्या लाईव्ह मुलाखतीत सिध्दार्थने त्याच्या करियरच्याही विविध गोष्टी शेयर केल्या. यावेळी लोकांना कोरोनाच्या संकटापासून वाचण्यासाठी घरात बसण्याचंही आवाहन यावेळी सिध्दार्थने केलं. 

सध्या सिध्दार्थ लॉकडाउनमध्ये त्याच्या कुटुंबासोबत वेळ घालवतोय आणि घरकामातही मदत करतोय. 

Recommended

PeepingMoon Exclusive