By  
on  

पाहा Video : असं सुरु आहे 'सैराट' फेम रिंकू राजगुरुचं लॉकडाउन

'सैराट' सिनेमातून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली आर्ची आता तिच्या करियरमध्ये विविध प्रयोग करु पाहतेय.  'हंड्रेड' नावाची हिंदी वेब सिरीजही तिने केली आहे ज्यातून तिचं वेब प्लॅटफॉर्मवर पदार्पण झालं आहे. नुकत्याच दिलेल्या लाईव्ह मुलाखतीत तिने ती घरात बसून सध्या काय काय करतेय याविषयी सांगीतलं. रिंकूला कुकिंगचीही आवड असल्याने ती घरात कुकिंगही करतेय. यावेळी बोलताना पुरणपोळी खायला आणि बनवायलाही प्रचंड आवडत असल्याचं रिंकूने सांगीतलं. शिवाय तिच्या आगामी प्रोजेक्टविषयीही रिंकू यावेळी बोलली.

रिंकू ही अभिनेत्री श्रीदेवी यांची खूप मोठी चाहती असल्याचं ती वारंवार सांगते. शिवाय त्यांचा एकही सिनेमा तिने चुकवला नसल्याचं ती यावेळी म्हटली. श्रीदेवी यांचा 'सदमा' सिनेमा पाहून रिंकू प्रभावीत झाली होती. लॉकडाउनमुळे रिंकू घरात बसून वाचनही करते. तिला चित्रकलेची आवड असल्याचही ती यावेळी  म्हटली.

Recommended

PeepingMoon Exclusive