अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनीदेखील अभिनेता इरफान खान यांना श्रद्धांजली वाहिली आहे. सोशल मिडीयावर इरफानसोबतचा जुना फोटो पोस्ट करत त्या लिहीतात की, "मी माझा पहिला सहकलाकार, मित्र आणि हुशार अभिनेता गमावरलाय". शिवाय नुकत्याच दिलेल्या टेलिफोनीक मुलाखतीत त्यांनी 'श्रीकांत' या टेलिव्हिजन सिरीजमध्ये इरफानसोबतच्या आठवणींना उजाळा दिला. बऱ्याच कालावधीपासून मृणाल या इरफान यांच्यासोबत संपर्कात असल्याचही त्यांनी सांगीतलं.