EXCLUSIVE : लॉकडाउनमुळे ऋषी यांचं अंत्यदर्शन घेता न आल्याची खंत - पूनम ढिल्लन

By  
on  

ऋषी कपूर यांच्या निधनावर बॉलिवुडवर शोककळा पसरली आहे. त्यांच्यासोबत काम केलेल्या कोस्टार्सनेही त्यांच्या जाण्यानं दु:ख व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. लॉकडाउनमध्ये त्यांच्या अंत्यदर्शनात सहभागी न होता आल्याने बऱ्याच कलाकारांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली आहे. अभिनेत्री पूनम ढिल्लोन यांनी देखील नुकत्याच दिलेल्या टेलीफोनीक मुलाखतीत ऋषी यांच्या जाण्याचं दु:ख व्यक्त केलं आहे. ऋषी हे त्यांचे आवडते सहकलाकार असल्याचं त्या म्हटल्या. शिवाय सध्या लॉकडाउनमुळे त्यांच्या अंत्यदर्शनात सहभागी होता न आल्याची खंत असल्याचही त्या म्हणाल्या.

Recommended

Loading...
Share