EXCLUSIVE : ऋषी कपूर यांनी माझं केलेलं कौतुक कायम स्मरणात राहील - वर्षा उसगांवकर

By  
on  

ऋषी कपूर यांच्या निधनाने बॉलिवुड हळहळ व्यक्त करतय. त्यातच त्यांच्यासोबत काम करणारे सहकलाकार ऋषी यांच्या आठवणींना उजाळा देत आहेत. अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांनी ऋषी यांच्यासोबत 'हनीमून' या सिनेमात काम केलं होतं. या सिनेमाच्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला आहे. नुकत्याच दिलेल्या टेलीफोनीक मुलाखतीत त्यांनी एक महत्त्वाची आठवण शेयर केली आहे. ऋषी यांनी पत्नि नितू कपूर यांच्यासमोर वर्षा यांचं कौतुक केलं होतं. वर्षा उसगांवकर यांची स्वच्छ हिंदी भाषा ऋषी यांना आवडली होती. ही आठवण वर्षा कायम स्मरणात ठेवणार असल्याचं त्यांनी सांगीतलं.

 

 

Recommended

Loading...
Share