पाहा Video : बिग बॉस मराठीनंतर रुपाली भोसलेचं असं बदललं आयुष्य

By  
on  

अभिनेत्री रुपाली भोसले ही बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वात स्पर्धक म्हणून दिसली होती. या शोनंतर रुपालीच्या आयुष्यात खूप बदल झाले असल्याचं रुपालीने नुकत्याच दिलेल्या लाईव्ह मुलाखतीत सांगीतलं. बिग बॉस मराठीच्या शोमधून बाहेर पडल्यानंतर रुपालीचं आयुष्य खूप बदललं आहे. करियरच्या दृष्टीने रुपालीच्या आयुष्यात दुसरी इनिंग सुरु झाल्याचं ती सांगते. बिग बॉसच्या घराबाहेर आल्यानंतर रुपालीन 'गांधी हत्या आणि मी' हे नाटक करत होती. 

सध्या रुपाली तिचे आई, वडिल आणि भावासोबत घरीच आहे. नुकतच रुपालीने तिचं कुकिंग युट्यूब चॅनेलही सुरु केल्याचं ती सांगते. रुपालीला कुकिंगची आवड असल्याने ती सध्या जास्तीत जास्त वेळ स्वयंपाक घरात घालवतेय. रुपाली आणि निर्माता अंकित मगरे हे दोघं रिलेशनमध्ये आहेत. सोशल मिडीयाच्या माध्यमातून दोघांचे एकत्र फोटो पाहायला मिळतात. 

Recommended

Loading...
Share