पाहा Video : 'कँडल' गाण्याविषयी धकधक गर्ल माधुरी दीक्षितसोबत दिलखुलास गप्पा

By  
on  

सौंदर्यवती आणि बॉलिवुड सुपरस्टार माधुरी दीक्षित नेेने आता तिच्या गायनाच्या आवडीकडे वळली आहे. लहानपणापासूनची गायनाची आवड असलेली माधुरी तिचा हा छंद जोपासतेय. नुकतच कँडल नावाचं नवं कोरं गाणं तिने  गायलं आहे. या गाण्याच्या निमित्ताने दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत माधुरीने बऱ्याच गोष्टी शेयर केल्या. लहानपणापासूनच स्टेजवर नृत्य, ड्रामा, गायन या सगळ्या गोष्टी करणारी माधुरी तिच्या या गाण्याविषयी सांगते. हे गाणं माधुरीने इंग्रजी भाषेत गायलं आहे. इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेतलं असल्याने माधुरीला इंग्रजी गाणी गायची प्रचंड आवड आहे. म्हणूनच "भाषेपेक्षा भावना महत्त्वाची" असं ती म्हणते. इतकी वर्षे मनोरंजन विश्वात यशस्वी करियर सुरु असलेल्या माधुरीहा स्ट्रगल पाहावा लागला होता याविषयी सांगताना सुभाष घई यांचाही उल्लेख माधुरी करते. माधुरीच्या दोन्ही मुलांनाही म्युझिकची आवड आहे. शिवाय पति श्रीराम नेने यांनाही म्युझिकची आवड असल्याने ते गिटार वाजवतात. 

'कँडल' हे गाणं माधुरीने लॉकडाउनच्या आधी लॉस एंजेलिसमधील एका प्रसिद्ध स्टुडिओमध्ये रेकॉर्ड केलं होतं. आणि याचा व्हिडीओ लॉकडाउनच्या काळात घरातच चित्रीत केला आहे.

Recommended

Loading...
Share