पाहा Video : अभिनेता सिध्दार्थ चांदेकरची ऐतिहासिक सिनेमात काम करण्याची इच्छा

By  
on  

अभिनेता सिध्दार्थ चांदेकरला विविध सिनेमांमधून, मालिकांमधून, वेब सिरीजमधून विविध भूमिका साकारताना पाहिलय. मात्र त्याची एक अशी भूमिका साकारायचं राहिलय ज्याची त्याला प्रचंड इच्छा आहे. सिध्दार्थला ऐतिहासिक सिनेमाचा भाग होण्याची इच्छा आहे. त्याला ऐतिहासिक भूमिका साकारायची इच्छा असल्याचं त्याने नुकत्याच दिलेल्या लाईव्ह मुलाखतीत सांगीतलं आहे. यावेळी सिटी ऑफ ड्रिम्स या वेब सिरीजला मिळालेल्या प्रतिसादाविषयीही तो भरभरून बोलला. या सिरीजमधील वेगळ्या भूमिकेचं प्रचंड कौतुक झालं होतं.

लॉकडाउनच्या काळात सिध्दार्थ आता त्याची आई आणि गर्लफ्रेंड अभिनेत्री मिताली मयेकरसोबत पूण्यात आहे. मागील वर्षी मिताली आणि सिध्दार्थचा साखरपुडा पार पडला होता. यावर्षी लग्नही होणार होतं, मात्र लॉकडाउन आणि कोरोनाग्रस्त परिस्थितीमुळे लग्नाची तारीख पुढे ढकलण्याचा निर्णय दोघांनी घेतला आहे. लग्नाची सगळी तयारी झाली असताना आता लग्नसोहळा पुढे ढकलला असल्याचं त्याने या मुलाखतीत सांगीतलं आहे.

Recommended

Loading...
Share