पाहा Video : हा अभिनेता आता आहे डॅडी अरुण गवळींचा जावई, सांगतोय लग्नानंतर ही गोष्ट

By  
on  

अभिनेता अक्षय वाघमारेने लॉकडाउनच्या काळात लगीनगाठ बांधली आहे. डॅडी म्हणून प्रसिद्ध असलेल्या अरुण गवळी यांची कन्या योगिता गवळीसोबत अक्षय वाघमारे लग्नबंधनात अडकला आहे. कोरोनाग्रस्त परिस्थिती आणि लॉकडाउन लक्षात घेता दोघांनी काही जवळच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत दगडी चाळीत हा विवाह सोहळा केला. लग्नानंतर नुकत्याच दिलेल्या लाईव्ह मुलाखतीत अक्षयने अरुण गवळींसोबत असलेल्या त्याच्या नात्याविषयी सांगीतलं. अरुण गवळी यांना भेटण्याआधी अक्षयचा त्यांच्यासोबत पत्रव्यवहार होत असल्याची गोष्ट त्याने यावेळी सांगीतली. 

अक्षयने काही मालिका आणि मराठी सिनेमांमध्येही काम केलं आहे. अक्षयच्या करियरची सुरुवात मॉडेलिंगपासून झाली होती. 

Recommended

Loading...
Share