'बिग बॉस मराठी ३' मध्ये हे ब्रेकअप झालेलं टेलिव्हिजनवरचं प्रसिध्द कपल झळकण्याची आहे चर्चा

By  
on  

'बिग बॉस  मराठी' हा रिएलिटी शो प्रचंड लोकप्रिय आहे. नुकतंच या कार्यक्रमाच्या तिस-या सीझनची घोषणा झाली आहे. तिस-या सीझनच्या घोषणेसोबतच या शोमध्ये सहभागी होणा-या कलाकारांच्या बद्दलची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. अनेक कलाकारांच्या नावाच्या चर्चा बिग बॉसच्या घरात जाण्याबदद्ल होत आहेत. आता या कार्यक्रमात टेलिव्हिजनवरील एका प्रसिध्द जोडीच्या नावाची चर्चा रंगली आहे. पण ख-या आयुष्यात मात्र या जोडीचं ब्रेकअप झाल्याचं बोललं जात आहे.

ही जोडी म्हणजेच अक्षया देवधर आणि सुयश टिळक. अभिनेत्री अक्षया देवधरने तुझ्यात जीव रंगला या मालिकेतून पाठक बाई साकारत अख्या  महाराष्ट्राची मनं जिंकली. तर का रे दुरावा या मालिकेतून अभिनेता सुयश टिळक घराघरांत पोहचला. 

या दोघांनी आपल्या नात्याची जाहिर कबुली कधी दिली नव्हती पण एकमेकांसोबतचे फोटो ते नेहमी शेअर करायचे. 

चाहते या अक्षया आणि सुयशच्या फोटोंना भरभरुन प्रतिसाद द्यायचे,

या दोघांच्या ब्रेकअपची बरीच चर्चा रंगली होती. अक्षया आणि सुयशच्या ब्रेकअपमुळे चाहते बरेच नाराज झाले.

 

सोशल मिडीयावरुन त्यांनी एकमेकांना अनफॉलोसुध्दा केलं होतं. 

आता ही जोडी खरंच जर बिग बॉस मराठी ३ मध्ये झळकली तर नेमकं काय घडेल याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

 

Recommended

Loading...
Share