Big Boss Marathi 4 - अक्षय केळकर ने कोरलं बिग बॉस मराठीच्या 4 थ्या सीझनच्या विजेतेपदावर नाव

By  
on  

बिग बॉस’ मराठीच्या चौथ्या पर्वाचा महाअंतिम सोहळा आज पार पडला. सीझनच्या  विजेतेपदावर अक्षय केळकरने नाव कोरलं. घराबाहेर पडलेल्या स्पर्धकांचे रंगतदार डान्स परफॉर्मन्स या सोहळ्यात पाहायला मिळतायत. अवघ्या महाराष्ट्रीचे डोळे या बहुचर्चित रिएलिटी शोकडे लागले होते. अक्षय केळकर बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाचा विजेता तर अपूर्वा नेमळेकरने पटकावले दुसरे स्थान. अक्षय केळकरला १५ लाख ५५ हजार इतकी धनराशी मिळाली आणि ट्रॉफी. तर पु.ना.गाडगीळ आणि सन्स तर्फे १० लाख रुपयांचे बंपर गिफ्ट व्हाउचर. 

 

बिग बॉसच्या घराला या आठवड्यात मिळाले टॉप ५ सदस्य मिळाले होते.  घरात अपूर्वा नेमळेकर, किरण माने , अमृता धोंगडे , अक्षय केळकर आणि राखी सावंत हे स्पर्धक उरले होते.


खेळाडूवृत्ती, टास्क मधली मेहनत, स्पष्टवक्तेपणा यामुळे तो नेहेमीच चर्चेत राहिला. बिग बॉस मराठीच्या या पर्वामध्ये सदस्य म्हणून जाण्याची संधी त्याला मिळाली आणि आता तो या पर्वाचा विजेता ठरला.

आधी राखी ९ लाख रुपये घेऊन बिग बॉस मराठीच्या टॉप ५ मधून घराबाहेर पडली. त्यानंतरच्या एव्हिक्शनमध्ये कोल्हापूरची मिर्ची अमृता धोंगडेला घराबाहेर पडावं लागलं, त्यानंतर घराला मिळाले टॉप ३ सदस्य. किरण माने, अक्षय केळकर आणि अपूर्वा नेमळेकर. मग माने घराबाहेर गेले आणि अपूर्वा व अक्षय टॉप २ला पोहचले. 

 

 

Recommended

Loading...
Share