Big Boss Marathi 4 -फिनालेआधी अपूर्वाची पोस्ट, म्हणते"आता ख-या अर्थाने...."

By  
on  

अनेक कारणांनी चर्चेत असलेल्या बिग बॉस मराठी सीझन ४ या शोची ही शेवटी चावडी होती. या शेवटच्या चावडीवर शेवटचं एलिमिनेशन झालं आणि अभिनेता प्रसाद जवादे घराबाहेर पडला. ‘बिग बॉस’मध्ये अपूर्वा नेमळेकर, राखी सावंत, अमृता धोंगडे, किरण माने, प्रसाद जवादे, अक्षय केळकर, आरोह वेलणकर हे सदस्य उरले. पण यांच्यातही आठवड्याच्या मध्यावर म्हणजेच बुधवारी बिग बॉसच्या घरात एलिमिनेशन पार पडलं  आणि आरोह घराबाहेर गेला.  बिग बॉसच्या घराला मिळाले टॉप ५ सदस्य. आता घरात अपूर्वा नेमळेकर, किरण माने , अमृता धोंगडे , अक्षय केळकर आणि राखी सावंत हे स्पर्धक उरले असून ते टॉप ५ स्पर्धक आहेत.  या स्पर्धकांमधून विजेतेपद कोण पटकावणार ह्याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.अपूर्वा नेमळेकर पहिल्या दिवसापासूनच या घरात चर्चेत होती. तिच्या खेळाने त्याचप्रमाणे तिने या घरामध्ये केलेल्या वक्तव्यांनी सर्वांचं लक्ष वेधलं होतं. 

नुकतंच शनिवारी बिग बॉसच्या घरात सर्व घराबाहेर गेलेल्या सदस्यांनी पुन्हा घरात येऊन टॉप  5 स्पर्धकांची भेट घेतली. 

या रियुनियनदरम्यानचे काही खास क्षण अपूर्वाने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर केले आहेत. एक व्हिडीओ पोस्ट करत तिने लिहिलं, “वाद विवाद खूप झाले, जिंकण्याच्या शर्यतीत नॉमिनेट केले पण शेवटी आम्ही एकत्र प्रवास सुरू केला होता, जिव्हाळा तर असलाच पाहिजे. बिग बॉस मराठी पर्व ४ चे हे कुटुंब ९९ व्या दिवशी पुन्हा एकत्र आले! अगदी एका सिनेमातील उत्तरार्धात सर्व पात्र एकत्र येतात तसेच काहीसे ! आता खऱ्या अर्थाने All Is Well झालं.”

 

Recommended

Loading...
Share