By  
on  

Big Boss Marathi 4 - विकास पाटीलने दिली टॉप 5 स्पर्धकांना 9 लाखांची ऑफर, कोण स्विकारणार?

‘बिग बॉस’ मराठीच्या चौथ्या पर्वाचा महाअंतिम सोहळा सुरु झाला आहे. घराबाहेर पडलेल्या स्पर्धकांचे रंगतदार डान्स परफॉर्मन्स पाहायला मिळतायत.आता थोड्याच वेळात घरात टॉप ३ आणि मग टॉप २ आणि त्यानंतर विजेता जाहीर होईल. अवघ्या महाराष्ट्राचे डोळे या बहुचर्चित रिएलिटी शोकडे लागले आहेत. 

यंदा बिग बॉस मराठीचा विजेता कोण ठरणार? याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. तब्बल १०० दिवसांचा खेळ पूर्ण केल्यानंतर ‘बिग बॉस’च्या घराला टॉप ५ सदस्य मिळाले आहेत. यात अपूर्वा नेमळेकर, अक्षय केळकर, राखी सावंत, किरण माने आणि अमृता धोंगडे या स्पर्धकांचा समावेश आहे. यापैकी केवळ एका स्पर्धकाला बिग बॉस मराठीची मानाची ट्रॉफी मिळणार आहे.

आता अशातच या खेळात एक मोठा टप्पा आहे. मागच्या सीझनचा टॉप ३ मधला स्पर्धक विकास सावंत ९ लाखांची बॅग घेऊन घरात आला आहे. त्याने या पाचही जणांना ९ लाख रुपये घेऊन घराबाहेर पडण्याची सुपर-डुपर ऑफर दिलीय. सगळेच स्पर्धक एवढे मोठी रक्कम पाहून आश्चर्यचकित झाले आहेत. जो ही रक्कम स्विकारेल तो या खेळातून बाद होईल. 

 

 

पाच जणांपैकी कोण ही ऑफर स्विकारणार ह्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive