या कलाकारांनी दिला बिग बॉसच्या घरात जाण्यास नकार, तुम्ही ओळखलं का ?

By  
on  

बिग बॉस 3 चे पडघम आता वाजले आहेत. छोट्या पडद्यावरचा सगळ्यात लोकप्रिय आणि वादग्रस्त शो बिग बॉसचा तिसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाले आहेत. 19 सप्टेंबरला हा शो प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. पण सध्या सुरु आहे ती नावांची. या शोमध्ये कोण कोण स्पर्धक असणार याचे आराखडे बांधायला सुरुवात झाली. काही कलाकारांना तर विचारलंही गेलं. पण या कलाकारांनी बिग बॉसच्या घरी जाण्यास सपशेल नकार दिला. 

अपुर्वा नेमळेकर :  शेवंताच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली  अभिनेत्री म्हणजे अपुर्वा नेमळेकर. अपुर्वाची लोकप्रियता पाहता ती बिग बॉसमध्ये दिसण्याची शक्यता वर्तवली जात होती. पण तिने यात सहभागी होण्यास नकार दिला आहे. 

 

 

सुयश टिळक : शुभमंगल ऑनलाईन मालिका संपल्यानंतर सुयशने केलेल्या पोस्टने लक्ष वेधलं आहे. त्यात सुयश म्हणतो, शुभमंगल ऑनलाईन या मालिकेचा प्रवास लवकरच संपत असून माझा एक नवीन प्रवास सुरू होणार आहे. हा नवीन प्रवास बिग बॉस मराठीच्या घराकडे जाणारा नाही. मी त्यात सहभागी होत असल्याच्या बातम्यांवर विश्वास ठेवू नका..

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Suyash Tilak (@suyashtlk)

 

केतकी चितळे: अनेक कॉन्ट्रॉवर्सीमध्ये असलेली अभिनेत्री केतकी चितळे प्रकृतीच्या कारणास्तव सहभागी होणार नसल्याचं समोर आलं आहे. 

 

 

 

ऋषी सक्सेना : 'काहे दिया परदेस' फेम ऋषी सक्सेना तिस-या सीझनमध्ये दिसणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता. पण एका चाहत्याला दिलेल्या उत्तरात ऋषीने ही बाब नकारली. 

 

 

 

प्रणित हाटे : ट्रान्सजेंडर सुत्रसंचालक प्रणित म्हणजेच गंगा यंदा बिग बॉसच्या घरात जाणार असल्याची चर्चा सुरु होती. पण गंगाने कार्यक्रमाच्या निर्मात्यांकडून संपर्क न झाल्याचं सांगत यावर पडदा टाकला.

 

 

Recommended

Loading...
Share