सेलिब्रिटींच्या आयुष्याला कलाटणी देणा-या आणि बाहेरच्या जगापासून खुप दूर असणा-या बिग बॉसच्या घराबद्दल प्रेक्षकांना नेहमीच कुतुहूल असतं. यंदा बिग बॉस मराठीच्या ३ -या पर्वाचं बिगुल वाजलं आहे. तेव्हा यात कोणकोणते सेलिब्रिटी आमने-सामने येणार नेमकं काय घडणार याबरोबरोच बिग बॉसच्या घराची नेमकी यावेळेची रचना काय असेल याबद्दल बरीच उत्सुकता आहे.
तेव्हा, चला या फोटोंमधून करुया बिग बॉसच्या घराची सुंदर सफर
नेहमीप्रमाणेच बिग बॉस मराठी ३ चं घर हे सुंदर, आकर्षक आणि प्रशस्त आहे.
हे सुंदर स्वयंपाकघर आहे. घरातल्या वादाची ठिणगी कदाचित इथूनच पेटेल आणि गुप्त खलबतं सुध्दा इथेच कुटली जातील.
घराचा प्रत्येक कोपरा अन् कोपरा सुंदर सजवला आहे.
ही स्पर्धकांची प्रशस्त बेडरुम आहे.
बेडस्च्या मागे चेह-यांची सुंदर ग्राफिटी पाहायला मिळतेय.
हे घराचं स्टोअर रुम आहे.
वॉशबेसिन जवळची ही मनमोहक सजावट प्रेमातच पाडतेय.
रंगीबेरंगी खुर्च्यांचं डायनिंग टेबलही घराच्या सौंदर्यात चार चॉंद लावतंय.
घराच्या गार्डन एरियात सुंदर हिरवळीवर वसलेलं स्विमींगपूल एरिया खुपच मनमोहक आहे. तसंच घराच्या प्रवेश दारावळ सुंदर तुळशी वृंदावन आहे.
याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, नथ घातलेली मराठमोळ्या तरुणीचं चित्रं लक्षवेधी ठरतंय.
हा गार्डन एरियातला सुंदर सिटींग एरिया आहे.
हा बिग बॉसच्या घरातला तुरुंग आहे.
अनेकदा बंडखोर स्पर्धकांना किंवा नियमांचं उल्लघंन करणा-या स्पर्धकांना इथे रहाण्याची आज्ञा देण्यात येते.
हा घराचा जीम एरिया आहे.