बिग बॉस मराठी 3 : बिग बॉस मराठीच्या घरातली पहिली सकाळ उजाडली!

By  
on  

छोट्या पडद्यावरील वादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय रिएलिटी शो बिग बॉस मराठा ३ चा नुकताच ग्रॅण्ड प्रिमीयर संपन्न होत कार्यक्रमाचा श्रीगणेशा झाला. गेले कित्येक दिवस सुरु असलेली स्पर्धकांबद्दलची उत्सुकता आता शमलीय, अनेक प्रसिध्द चेहरे यंदाच्या बिग बॉसमध्ये पाहायला मिळतायत. बिग बॉसच्या घरात आता प्रत्येक स्पर्धक काय खेळी खेळणर. आपले कोणते रंग दाखवणार यासाठी प्रेक्षकांसह चाहत्यांची उत्सुकता ताणली गेलीय. 

अखेर बिग बॉसच्या घरातला स्पर्धकांचा पहिला दिवस उजाडला आहे. दे धक्का गाण्यावर सर्वांनी एकत्र येत सकाळी सकाळी जबरदस्त ताल धरलाय. अक्षय वाघमारे, विकास पाटील, अविष्कार दारव्हेकर, स्नेहा वाघ, सोनाली पाटील, जय दुधाणे, मीनल शाह, उत्कर्ष शिंदे, तृप्ती देसाई, दादूस संतोष चौधरी,  शिवलीला पाटील, विशाल निकम, मीरा जगन्नाथ, सुरेखा कुडची , गायत्री दातार हे सगळेच  मिळून धम्माल नाचताना पाहायला मिळाले. 

 

 

 

हिंदीमधील ‘बिग बॉस ओटीटी’ चर्चेत असताना आता मराठी बिग बॉसच्या तिस-या पर्वाची घोषणा केली. 'अनलॉक एण्टरटेनमेन्ट' अशी यंदाच्या पर्वाची टॅगलाइन आहे. ह्या 3 -या सीझनचा गेम कसा असेल याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

Recommended

Loading...
Share