बिग बॉस मराठी 3: तृप्ती देसाईंचा बिग बॉसच्या घरात इंदुरीकर महाराजांबद्दल खुलासा

By  
on  

 ‘बिग बॉस मराठी’ सिझन ३ ची धमाकेदार सुरुवात झालीय. अनेक वेगवेगळी व्यक्तिमत्त्व एकाच छताखाली राहणार आहेत. तेव्हा  पहिल्याच दिवशी इतकं काही घडलंय तर पुढे काय घडणार याबाबत प्रेक्षकांमध्ये बरीच उत्सुकता आहे. . यंदाच्या सिझनमध्ये कलाकारांसोबतच सामाजिक कार्यकर्त्या आणि भूमाता ब्रिगेडच्या संस्थापिका तृप्ती देसाई बिग बॉसमध्ये सहभागी झाल्या आहेत. दरम्यान त्यांनी पहिल्याच भागामध्ये इंदुरीकर महाराजांशी संबंधीत वक्तव्य केले आहे.

‘बिग बॉस मराठी ३’मध्ये तृप्ती देसाई, किर्तनकार शिवलीला बाळासाहेब पाटील, मीनल शाह आणि सुरेखा कुडची गप्पा मारत असतात. दरम्यान त्या इंदुरीकर महाराजांविषयी बोलत असल्याचे दिसून आले. शिवलीला म्हणाल्या की, ‘मी म्हणताना असं म्हटलं की या तृप्ती ताई देसाई आहेत. यांनी इंदुरीकर महाराजांच्या विरोधात केस केली होती.” असे म्हणत शिवलीला यांनी मी पुराव्यांच्या आधारेच किर्तन करते असे सांगितले.

तृप्ती देसाई पुढे  म्हणाल्या की, ‘पण त्यांची बरीच किर्तने ही महिलांचा अपमान करणारी होती. आमच्या आंदोलनानंतर इंदुरीकर महाराजांची बरीचशी किर्तने यूट्यूबवरुन डिलिट केली गेली. म्हणजे जवळजवळ ८० टक्के किर्तने डिलिट केली.’ त्यानंतर शिवलीला यांनी ‘बऱ्याच किर्तनकारांनी डिलिट केली आहेत’ असे म्हटले. त्यावर उत्तर देत तृप्ती म्हणाल्या, ‘कारण तेव्हा मी ती मोहिमच चालवली होती. संपूर्ण जिल्हा माझ्या विरोधात उभा होता. मी जाणार म्हटल्यावर १०० किलो मिटर आधी पोलिसांनी मला आधीच ताब्यात घेतले.’

महिलांनी फेटा घालू नये असं इंदुरीकर महाराज म्हणाले होते. “महिलांनी फेटा घातला तर आम्ही काय गाउन घालायच का?” हे त्यांचं वक्तव्य चुकीचं होतं” असं तृप्ती देसाई म्हणाल्या.

Recommended

Loading...
Share