By  
on  

बिग बॉस मराठी 3 Day 4 : दादुस ऑर्केस्ट्रा ! विकास, उत्कर्ष, मीनल आणि सुरेखा यांची धम्माल मस्ती

 बिग बॉस मराठीच्या घरात आज टास्कसोबतच रंगणार जबरदस्त कार्यक्रम – दादुस ऑर्केस्ट्रा – फॅशन शोभेल तुला ! काल प्रक्षेपित झालेल्या प्रोमोमध्ये अचानक दोन महिला आणि दोन पुरुष वेगळयाच गेटअपमध्ये दिसून आले, कोण आहेत हे नवीन सदस्य बिग बॉस मराठीच्या घरामध्ये हा प्रश्न मनात येऊन गेला...

पण तसं नाहीये उत्कर्ष शिंदे आणि विकास पाटील यांनी बायकांचा गेटअप तर सुरेखा कुडची आणि मीनल शाह हिने पुरुषांचा गेटअप परिधान केला आहे. चोघे सुध्दा त्यामध्ये एकदम पर्फेक्ट दिसत आहेत असं म्हणायला हरकत नाही.

दादुस ऑर्केस्ट्रा – फॅशन शोभेल तुला या कार्यक्रमात विकास पाटील हृदयी वसंत फुलताना या गाण्यावर मीनल शाह सोबत नृत्य सादर करणार आहे तर उत्कर्ष शिंदे सुरेखा कुडची यांच्यासोबत ही पोरगी साजूक तुपातली या गाण्यावर धम्माल डांस करणार आहे.

यांना साथ मिळणार आहे दादुस (संतोष चौधरी) यांची. घरातला माहोल एकदम हलकाफुलका होताना दिसणार आहे आणि सदस्यांनी बरीच धम्माल मस्ती केलेली या प्रोमो मधून दिसून येते आहे.

कसा झाला आहे दादुस ऑर्केस्ट्रा – फॅशन शोभेल तुला कार्यक्रम बघा आजच्या बिग बॉस मराठीच्या भागामध्ये रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive