By  
on  

बिग बॉस मराठी 3 चा हा स्पर्धक आहे दादा कोंडकेंचा नातू ?

मराठी बिग बॉसच्या तिस-या सीझनचं धुमशान नुकतंच सुरु झालं आहे. आता कुठे प्रत्येक स्पर्धकाचे खरे रंग दिसायला सुरुवात झाली आहे. या सीझनमधील स्पर्धकांबाबत माहिती समोर येताना दिसते आहे.  या स्पर्धकांमध्ये दिवंगत अभिनेते दादा कोंडके यांचा नातूसुद्धा आहे.

 

 

घरामध्ये डॅशिंग अंदाजात एंट्री घेतलेला अभिनेता अक्षय वाघमारे दादा कोंडकेंचा नातू हे खुप कमी लोकांना माहिती आहे. अक्षयच्या वडिलांची आत्या ही दादांच्या कुटुंबातील सदस्य असल्याचं अक्षयने यावेळी सांगितलं. अक्षयला या आठवड्याच्या टास्कमध्ये शेफ बनून वाईट रेसिपी बनवण्याचा आदेश होता. या टास्कमध्ये निर्णय होऊ न शकल्याने तो रद्द झाला होता.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive