बिग बॉसच्या घरातील या आठवड्यातील कॅप्टन्सी टास्क आता पार पडलं आहे. पण या दरम्यान सुरु झालेली धुसफुस आता वणव्याचं रुप घेताना दिसते आहे. घरातील सदस्यांमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणावरुन वाद होताना दिसत आहेत. कॅप्टन असलेल्या उत्कर्षने घरातील कामांची वाटणी सुरु केली आहे. पण कामाची जबाबदारी घेण्याच्या वाटणीवरुन सदस्यांमध्ये चांगलीच जुंपताना दिसते आहे.
आता तृप्ती आणि सोनालीमध्ये भांडण होताना दिसतं आहे. पुरुष जर घरची कामं करत होते तर महिलांनी का करु नयेत ? असा वाद तृप्ती घालत आहेत. तर सोनाली ‘महिला... महिला.... आणि भांडायला नंबर पहिला.. असं म्हणून त्यांची खिल्ली उडवताना दिसते. आता या दोघींच्या भांडणावर बिग बॉस काय टिप्पणी करतात ते आच्या भागात कळेलच.