बिग बॉसच्या तिस-या सीझनला दमदार सुरुवात झाली आहे. या सीझनचा पहिला वीकेंडचा वार बघता बघता पार पडला. यावेळी वीकेंडच्या वाराचं नाव बदलेलं असून बिग बॉसची चावडी करण्यात आलं आहे. या वेळी चावडीवर महेश मांजरेकरांनी चुकलेल्या स्पर्धकांची चांगलीच शाळा घेतली आहे. या दरम्यान रंगला तो नवा टास्क. मालकिणींना यावेळी बेस्ट आणि वर्स्ट सेवक निवडायचा होता.
तर कामगारांना बेस्ट आणि वर्स्ट मालकिण निवडायची होती. मालकिणींनी बेस्ट सेवक म्हणून विशालच्या नावाला पसंती दिली. तर वर्स्ट सेवक म्हणून आविष्कारचं नाव समोर आलं. यावेळी बेस्ट मालकिण ठरली स्नेहा वाघ तर वर्स्ट मालकिण म्हणून शिवलीला निवडली गेली. यावेळी एलिमिनेशनसाठी डेंजर झोनमध्ये सुरेखा कुडची, गायत्री दातार, शिवलीला पाटील, आविष्कार, मीरा जगन्नाथ, जय, मीनल शाह, तृप्ती देसाई हे स्पर्धक आहेत. आता उद्या एलिमिनेशनचा वार कुणावर होतो हे लवकरच समजेल.