By  
on  

Big boss Marathi 3: या चावडीवर एलिमिनिशेन टळल्याने आनंदी आनंद…….

बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांच्या आठवड्यातील कारकिर्दीचा लेखाजोखा चावडीवर मांडला जातो. चावडीचा आजचा दिवस महत्त्वाचा होता. कारण आज पार पडणार आहे या सीझनचं पहिलं वहिलं एलिमिनेशन.  एलिमिनेशनसाठी डेंजर झोनमध्ये सुरेखा कुडची, गायत्री दातार, शिवलीला पाटील, आविष्कार, मीरा जगन्नाथ, मीनल शाह, तृप्ती देसाई हे स्पर्धक होते. 

 

 

कार्यक्रमाच्या सुरुवातीला रंगली ती  उत्कर्ष आणि दादुसमधील जुगलबंदी. त्यानंतर नव्या गेममध्ये गायत्री- सोनाली आणि तृप्ती – शिवलीला आमने-सामने येताना दिसल्या. तर फॅन्सनी केलेल्या चुगलीबाबत अनेकांनी स्पष्ट चर्चा केली. यामध्ये पहिल्यांदा तृप्ती सेफ ठरल्या. तर विशेष म्हणजे अगदी शेवटी मागे राहूनही गायत्री आणि आविष्कार सेफ ठरले.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive