Bigg Boss Marathi 3 : स्नेहा वाघसोबतच्या घटस्फोटानंतर अविष्कारचा झाला होता कबीर सिंग

By  
on  

यंदाचा बिग बॉस मराठीचा ३ रा सीझन अनेक कारणांनी चर्चेत आहे.  यात एक महत्त्चाची आणि लक्षवेधी गोष्ट म्हणजे घटस्फोटित पती-पत्नी हे घरातले सदस्य आहेत. ते म्हणजे अभिनेत्री स्नेहा वाघ आणि अभिनेता आविष्कार दारव्हेकर. या जोडीला घरात एकत्र पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असतात.
पहिल्या दिवसापासूनच या दोघांच्या भूतकाळाबद्दल घरात आणि प्रेक्षकांमध्ये चर्चा सुरूअसून आहे. अलिकडच्या भागात आविष्कारने त्याच्या पूर्वाश्रमीच्या पत्नी विषयी आणि त्यांचे हे लग्न का मोडले या विषयी मोठा गौप्यस्फोट केला आहे..

आविष्कार त्याचा सहस्पर्धक जय दुधाणेला सांगिताना दिसला की जेव्हा स्नेहा वाघ आणि त्याचे नातं तुटलं तेव्हा स्नेहाने त्याच्यावर अनेक आरोप केले होते. एव्हढंच नव्हे तर  तो दारुमध्ये आकंठ बुडाला होता   आणि तो कबीर सिंग बनला होता, असे तो जयला सांगताना दिसला. यावर जय आविष्कारला म्हणाला की घरात तर स्नेहा ही खूप शांत आणि साध्या स्वभावाचे व्यक्तिमत्व वाटते. तर आविष्कारने सांगितले की ती अजिबात शांत नाही आहे आणि तिचे खरे रुप लवकरच समोर येईल.

बिग बॉसच्या घरात जाण्यापूर्वीच्या एका मुलाखतीत  स्नेहाने आविष्कारवर घरगुती हिंसाचाराचे आरोप केले होते, तो काळ तिच्यासाठी खुप कठीण होता. 

अवघी १९ वर्षांची असताना स्नेहाने आविष्कारसोबत लग्नगाठ बांधली होती. पण काही वर्षांतच ते विभक्त झाले होते. आता ब-याच मोठ्या कालावधीनंतर स्नेहा आणि आविष्कार आमने-सामने आले आहेत. 

Recommended

Loading...
Share