बिग बॉस मराठीच्या घरामध्ये कोण कोणाच्या बाजूने आहे हे कळण म्हणजे जरा कठीणच असतं. कोणता सदस्य कोणाच्या बाजूने वा कोणत्या ग्रुपला जॉइन होईल हे सांगता येत नाही. हे मात्र खरं की, आपण ज्यावर जास्त विश्वास ठेवतो तीच व्यक्ति कधी तुमच्या विरोधात जाईल हे कळणार नाही. त्यामुळे प्रत्येक वेळेला, प्रत्येक क्षणाला सदस्यांना खूप सतर्क राहावं लागतं.
शिवलीला, विकास आणि मीनल यांची चर्चा आज चांगलीच रंगणार आहे. मीनलच्या मनातला प्रश्न ती आज शिवलीला आणि विकास समोर मांडताना दिसणार आहे. सुरेखाताई नक्की कोणाच्या बाजूने आहेत ? हेच कळत नाहीये. एवढं त्यांना तोंडावर सांगितलं तरीपण त्यांच्याशी गुलूगुलू बोलत आहेत. ते जर कळलं तर आपल्याकडे त्यांना फिरवायला. यांचं संभाषण ऐकून हा प्रश्न नक्कीच पडू शकतो की, घरामध्ये दोन ग्रुप तर नाही ना तयार होत आहेत ? वा बनले आहेत ?
शिवलीलादेखील त्यांची strategy मांडताना दिसणार आहेत. त्या म्हणाल्या, “मोठी strategy ही आहे, की आपण सगळ्यांनी मिळून त्यांच्या ग्रुपमधले सदस्य कमी केले पाहिजे. हीच सगळ्यात मोठी strategy आहे. कोण आणि कसं कमी करायचं ते ठीक आहे ते नंतर बघता येईल. सगळयात महत्वाचा मुद्दा काय, पुढची माणसं आहेत ना आधी ती धडाधडा पाडा आणि पाडताना विचार करा जो पडणार नाही त्याला पाडू नका, जो कडेवर उभा आहे त्याला पाडा. काही काही लोकं अशी आहेत जो दोन्ही नावेत पाय टाकून प्रवास करत आहेत. त्यांना पण कळू देत की ही माणसं कशी आहेत ते.”