नुकताच बिग बॉस मराठी 3 चा दुसरा आठवडा सुरु झालाय. दुसऱ्याच आठवड्यात स्पर्धकांना आणखी एक नवा टास्क देण्यात आलाय. जोडी की बेडी ही आठवड्याची थीम असून बिग बॉस यांनी सदस्यांच्या जोड्या नेमून दिल्या आहेत. विविध टास्कनंतर जो टास्क प्रत्येक सिझनमध्ये प्रचंड वाद निर्माण करतो तो टास्क अखेर या सिझनमध्येही देण्यात आलाय.
बाईकवर बसून नॉमिनेट असलेल्या जोडीला हा टास्क करावा लागणार आहे. 'हल्ला बोल' असं या टास्कचं नाव आहे. आजच्या सातव्या दिवसाच्या भागात हा टास्क बघायला मिळेल. एका टीम मधील दोन सदस्य त्या मोटर बाईक वर बसणार आहेत आणि दुसर्या टीममधील सदस्य त्यांना उठवण्याचा प्रयत्न करणार आहे.या बाईकवर बसणारी दुसरी जोडी आहे विशाल आणि विकास.
या बसलेल्या सदस्यांवर पाण्याचा मारा होताना दिसतो आहे, धूर देण्यात येत आहे. पण या दरम्यानच तृप्ती आणि विकासमध्ये घमासान होताना दिसत आहे. विकासने आम्ही तुम्हाला यापेक्षा जास्त त्रास देऊ तर यावर असले अनेक आले गेले, धमक्या नका देऊ हे सुनावत आहेत.