सर्वत्र बिग बॉसच्या ३ -या सीझनची चर्चा रंगलीय. या सीझनमध्ये स्पर्धकांमध्ये बरेच राडे होताना आत्तापर्यंत पाहायला मिळतायत. या खेळात कधी काय घडेल ? हे कोणच सांगू शकत नाही. बिग बॉस मराठीच्या या पर्वामध्ये दोन सदस्यांची नावं गाजली आणि ती म्हणजे कार्यकर्त्या तृप्ती देसाई आणि कीर्तनकार शिवलीला बाळासाहेब पाटील अत्यंत वेगळ्या क्षेत्रातून आलेल्या या दोन्ही महिलांनी पहिल्याच दिवसापासून प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
नुकतच शिवलीला यांनी कार्यक्रमामध्ये सांगितले “इथला प्रत्येक माणूस माझा असेल”. त्यांच्या या वाक्याने सदस्यांबरोबरचं प्रेक्षकांची मने देखील जिंकली. पण, शिवलीला यांची प्रकृती अचानक ढासळली. आणि आज बिग बॉस यांनी जाहीर केल्याप्रमाणे वैद्यकीय उपचारांकरिता काही काळ त्यांना बिग बॉस मराठीच्या घराबाहेर जावं लागलं. त्यामुळे आजपासून व्होटिंग लाईन्स बंद राहतील.