बिग बॉस मराठीच्या घरात तिस-या सीझनमध्ये सुरुवातीपासूनच हल्ला-बोल सुरु आहे. अनेक कारणांनी यंदाचा सीझन चर्चेत आहे. एकापेक्षा एक वरचढ असे स्पर्धक एकमेकांसमोर उभे येऊन ठाकले आहेत. यातच घरात जणू दोन गट तयार झाले आहेत. सध्या घरात हल्ला बोल हा टास्क खेळण्यात येत आहेत. प्रत्येकाला आपलं स्थान टिकवून ठेवायचं आहे.
हल्ला बोल या टास्कमध्ये मोटार सायकलवर बसलेल्या एका गटातील सदस्यांना दुसऱ्या गटातील सदस्यांनी युक्ती लढवून उठवायचे आहे. तर मोटार सायकलवर बसलेल्या सदस्यांनी काहीही झालं तरी जास्तीत जास्त वेळ त्यावर बसून राहायचे होते.
नेहमीच महिलांच्या हक्कांसाठी लढणा-या त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या रहाणा-या रणरागिणी तृप्ती देसाई यांना नेटकरी जबरदस्त ट्रोल करतायत. या हल्लाबोल टास्कमध्ये तृप्ती देसाई महिलांच्याच अंगावर कचरा फेकताना दिसून आल्या. आता यांची तत्वं कुठं गेली असा सवाल नेटकरी करताना पाहायला मइलतंय.
सोनाली पाटील आणि सुरेखा कु़डची बाईकवर बसल्यानंतर तृप्ती देसाई यांनी दादूसच्या मदतीने घरातला कचरा आणि साबणाचं पाणी आणून त्यांच्या तोंडावर व अंगावर फेकलं .
महिलांच्या लीडर महिलांवरच कचरा फेकतायत, काय तत्व पाळतायत, तृप्ती ताईंना ओव्हर कॉन्फीडन्स आहे वाटतं अशाप्रकारच्या प्रतिक्रीया आल्या आहेत.