By  
on  

बिग बॉस मराठी 3 : मीनल शाह ठरली ‘Performer of the week’, महेश मांजरेकरांनी केलं कौतुक

 नुकताच बिग बॉसच्या घरात दुस-या चावडीचा एपिसोड रंगला. दरवेळीप्रमाणे यावेळी महेश मांजरेकर यांच्या खुमासदार निवेदनाने चावडीत रंग भरले. महेश मांजरेकर यांनी स्पर्धकांची शाळा घेण्यातही कोणती कसूर बाकी ठेवली नाही. 

 

 

पण यावेळी ‘Performer of the week’ चा मुकुट मात्र मीनल शाहच्या शिरावर सजला आहे. टास्क दरम्यान मीनलने दाखवलेल्या स्पिरीटचं महेश मांजरेकरांनी कौतुक केलं आहे. तसेच मीनल एकटीने तिच्या टीमसाठी लढत दिली हे देखील स्पेशली नमूद केलं. मागच्या आठवड्यात आजारपणामुळे घराबाहेर गेलेल्या शिवलीला पाटीलच्या तब्ब्येतीत आता सुधार होत असून ती लवकरच परतेल हे देखील महेश यांनी यावेळी नमूद केलं.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive