आठवड्याच्या शेवटी बिग बॉसच्या घरात रंगते ती चावडी. आठवडाभरात घडलेल्या घडामोडींवर सुत्रसंचालक महेश मांजरेकरांची करडी टिप्पणी असते. बिग बॉसच्या चावडीवरचा आजचा दिवस रंगला तो गेममध्ये. आज महेश मांजरेकरांनी नेहमीप्रमाणे कानपिचक्या देत सदस्यांसोबत धमाल गेमही खेळले.
आपल्याला ज्या सदस्याविषयी काही सांगायचं आहे त्याला पंच मारुन सांगण्याचा टास्कही रंगला. यासोबतच फॅन्सनी केलेल्या चुगलीमुळे सदस्यांचे खरे मुखवटेही समोर आले. मागच्या वेळी प्रकृतीच्या कारणामुळे घराबाहेर आलेली सदस्य शिवलीला पाटील हिने सदस्यांसाठी एक बाईट दिला होता.
यावेळी विशाल, मीनल, सुरेखा, सोनाली यांना अश्रू अनावर झाले. यावेळी महेश यांनी 5 लाख घेऊन हा खेळ सोडून जाण्याची संधी दिली. यावेळी आविष्कारने ही तयारी दाखवली. पण हा प्रॅंक असून यावेळीही कोणतं एलिमिनेशन नसल्याचं महेश यांनी जाहीर केलं.