बिग बॉस मराठीच्या घरात आज एक घोषणा झाली ज्यामुळे सदस्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. आणि ती घोषणा म्हणजे “बिग बॉस आपणा सर्वांना आपले फोन्स परत देते आहेत”. बिग बॉस मराठीच्या घरात येताना सदस्यांना बर्याच गोष्टींना बाहेरच सोडून यावे लागते, त्यातली एक गोष्ट म्हणजे फोन्स. आणि आज बिग बॉस तेच सदस्यांना परत करणार असे सांगणार आहेत. स्पर्धकांना त्यांचे फोन्स परत मिळणार ? पुढे काय काय गोंधळ उडणार हे तर हा एक नवा टास्क आहे म्हणून समजले. अशातच दोन आठवडयानंतर थोडी धम्माल-मस्ती घरात झाल्याचे पाहायला मिळाले.
यात सुरेखाताईंनी मालिकेतल्या सासूबाईंसारखी एक्टिंग करत सर्वांना रिझवले तर डायनिंग टेबलवर जयने चक्क सुरेखाताईंना गुडघ्यावर बसून प्रपोज केले. तेव्हा त्यांनीसुध्दा हसून आनंदाने त्याचा स्विकार केला. पण यादरम्यान जय हा आपलं स्नेहा वाघसोबतचं बॉंडींग किती स्ट्रॉंग आहे, हे सांगताना पाहायला मिळाला.तेव्हा हे प्रेमाचे वारे घरात नक्की कुठून कुठे वाहतायत. हे पुढील भागात पाहणं औत्सुक्याचं ठरेल.