बिग बॉस मराठीच्या घरात काल एक घोषणा झाली ज्यामुळे सदस्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. आणि ती घोषणा म्हणजे “बिग बॉस आपणा सर्वांना आपले फोन्स परत देते आहेत”. बिग बॉस मराठीच्या घरात येताना सदस्यांना बर्याच गोष्टींना बाहेरच सोडून यावे लागते, त्यातली एक गोष्ट म्हणजे फोन्स. आणि बिग बॉस तेच सदस्यांना परत करणार असे त्यांनी सांगितले. स्पर्धकांना त्यांचे फोन्स परत मिळणार ? पुढे काय काय गोंधळ उडणार ? हे तर नुकतेच समोर आले.
प्रोमोमध्ये घरामध्ये एक फोन दिसत आहे. म्हणजेच आज घरामध्ये एक फोन पाठवण्यात येणार आहे. त्या फोनची रिंग वाजली आणि घरामध्ये एकच आवाज घुमला “फोन आला, फोन आला”. आणि त्यातून बिग बॉस यांचा आवाज आला. ज्यामध्ये त्यांनी घोषित केले सदस्यांना त्यांचे फोन्स परत देणार. पण ते फोन म्हणजेच या आठवड्याचा नवा नॉमिनेशन टास्क आहे.
यात प्रत्येक स्पर्धकाने घरातील एका सदस्याचा फोन गळ्यात घालायचाय आणि तो फोन बूथवरील चार्र्जिंग पॉईंटवर योग्य वेळेत पोहचत चार्ज करायचाय. जो सदस्य यात आपल्या गळ्यात असलेल्या स्पर्धकाचा फोन चार्ज करण्यात अयश्स्वी ठरेल तो स्पर्धक या आठवड्यात घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट होणार आहे.
नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये सर्वच सदस्य हा नॉमिनेशन टास्क खेळण्यासाठी सज्ज झालेले पाहायला मिळाले. बझर वाजताच प्रत्येकजण चार्जिंग पॉंईंटवर आपला फोन लावण्यात यशस्वी ठरले. परंतु जयसोबत सोनालीची टास्कपूर्वी थोडी बाचाबाची झाली आणि त्यानंतर बझर वाजताच सोनाली आपला फोन चार्ज करण्यात अयशस्वी ठरली. तिच्या गळ्यात तृप्ती देसाईंचा फोन होता, त्यामुळे साहजिकच या आठवड्यात घराबाहेर जाण्यासाठी तृप्ती देसाई नॉमिनेट झाल्या आहेत.