By  
on  

बिग बॉस मराठी 3- Day 14 : अक्षय वाघमारे ठरणार  unfair संचालक?

बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्यांमध्ये कुठल्या ना कुठल्या कारणामुळे वादविवाद होताना दिसत असतात. हे सदस्य कधीकधी ही भांडण, मतभेद विसरून एकमेकांना साथ देताना देखील दिसतात. बिग बॉस मराठीचं हे घर प्रत्येक सदस्याला त्याची नव्याने ओळख करून देत असं म्हणायला हरकत नाही. बिग बॉस जेव्हा सदस्यांना एखादा टास्क देतात तेव्हा त्या टास्कचा एक संचालक देखील नेमून देतात. कधी हा संचालक fair आहे असं म्हणतात तर कधी unfair आहे असं म्हणतात. आजच्या भागामध्ये विकास अक्षयवर थोडा नाराज दिसणार आहे. आज होणार्‍या टास्कचा अक्षय संचालक आहे. अक्षयने असा कोणता निर्णय घेतला ज्यामुळे विकास त्याच्यावर इतका नाराज झाला आहे. कळेलच आजच्या भागामध्ये.

 
विकास आणि मीनलमध्ये आजच्या भागामध्ये या विषयावर चर्चा होणार आहे. मीनल विकासला सांगणार आहे “तू कितीही जीव तोड, काहीपण कर unfair होणार आहे. काही फायदा नाहीये यांच्यावर एनर्जि घालवून. तू तुझा मुद्दा मांड जो पण आहे, शेवटी तेच होणार आहे जे त्यांना हवं आहे. त्यामुळे स्वत:ला त्रास करून नको घेऊस. विकास म्हणाला, “अक्षय काय कामाचा आहे. कशाला त्याला संचालक केलं आहे. आपण fair खेळू आणि हारू”.
 
नक्की मीनल आणि विकास काय बोलत आहेत ? कळेल आजच्या भागामध्ये. तेव्हा नक्की बघा बिग बॉस मराठी सिझन तिसरा दररोज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive