By  
on  

बिग बॉस मराठी 3 : संध्याकाळ झाली की स्नेहाचा भीतीने थरकाप उडायचा, सांगितला 'तो' अनुभव

बिग बॉस मराठीचा यंदाचा तिसरा सीझन अनेक कारणांनी चर्चेत आहे. त्यापैकीच एक महत्त्वाचं कारण म्हणजे, पूर्वाश्रमीचे पती-पत्नी आविष्कार दारव्हेकर आणि स्नेहा वाघ. दोघांवर प्रेक्षकांची करडी नजर आहे. त्यांच्या वागण्या-बोलण्यात, टास्क खेळण्यावर प्रेक्षक बारीक लक्ष ठेऊन आहेत. त्यांच्या पूर्वायुष्याबद्दल सर्वांनाच जाणून घेण्याची उत्सुकता आहे. दरम्यान कार्यक्रमात स्नेहा वाघ आणि सुरेखा कुडतची झोपाळ्यावर गप्पा मारताना पाहायला  मिळाल्या. तेव्हा स्नेहाने आविष्कारसोबतच्या आपल्या लग्नाबद्दलचा तो कटू अनुभव सांगितला. 

स्नेहा सुरेखाला म्हणली. तो अनुभव खुप वाईट होता, मी फार लहान होते. अडनिडं वय होतं. त्या आठवणी पण मला नकोशा वाटतात. खुप दु:खद होतं सर्वकाही. सर्वांनाच सर्व माहित असायचं. माझ्या मालिकेच्या सेटवरच्या लोकांनासुध्दा. रोज माझ्या शरीरावर मारल्याच्या खुणा असायच्या. मी अर्धमेल्या अवस्थेतच सेटवर पोहचायचे. माझी अवस्था त्यांनाही बघवत नव्हती, पण ते सर्वचजण मला खुप समजून घ्यायचे. मला वेळ द्यायचे. 

पुढे स्नेहा सांगते, दररोज संध्याकाळी सेटवरुन घरी परतताना मनात एक भीती असायची, की आता आणखी काय वाढून ठेवलं असणार. मला खुप त्रास दिला आहे. मी तो विसरुच शकत नाही. तर मी पळून गेले आई-बाबांकडे. त्यानंतरही मला खुप त्रास देण्यात आला. मी फक्त 17 वर्षांची होते. तेव्हा मी फार घाबरायचे, पण आता मी ती स्नेहा राहिलेली नाही. घडलेलं कोणीच बदलू शकत नाही. मी पुन्हा त्याच्याकडे परतेन किंवा आमच्यात पुन्हा काही घडेल अशी तिळमात्रही आशा कोणी बाळगू नये. रेतीचा कण असतो तसाही नाही. 

स्नेहाचा हा अनुभव ऐकून सुरेखालाही खुप धक्का बसला.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive