बिग बॉसच्या घरातील टशनला आता कुठे सुरुवात झाली आहे. टास्क खेळताना स्ट्रॅटेजीमुळे धमाल येते आहे. पण या सगळ्या गोंधळाला एक गुलाबी किनारही जोडली जात आहे. या घरात आता जोड्या बनताना दिसत आहेत. पहिली जोडी आहे ती जय आणि स्नेहाची.
जय आणि स्नेहा या आठवड्यात ब-याचदा एकत्र दिसले. स्नेहादेखील जय कॅप्टन व्हावा यासाठी प्रयत्न करताना दिसली. जयचं सतत स्नेहाच्या आसपास असणं अनेकांना आश्चर्यचकित करणारं ठरलं. दुसरी जोडी आहे ती सोनाली आणि विशाल. सोनाली आणि विशालच्या मैत्रीवर चाहते खुष आहेत. पण त्यांची बाँडिंग थोडी जास्तच गहिरी होताना दिसते आहे.
या जोडीचं आंबट गोड बाँडिंग प्रत्येकालाच आवडतं आहे. आता येत्या काही दिवसात या दोन्ही जोड्या कितपत नव्या नात्यात जातात हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.