By  
on  

बिग बॉस मराठी 3 : विशाल आणि स्नेहा सेफ, तर कोण आहे एलिमिनेशनच्या उंबरठ्यावर

यंदाच्या सिझनमध्ये अनेक वेगळ्या गोष्टी प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहेत. यापैकीच एक म्हणजे चावडी.  प्रत्येक विकएन्डला या कार्यक्रमाचे होस्ट महेश मांजरेकर हे स्पर्धकांची शाळा घेतात. बिग बॉसच्या या चावडीवर आज मात्र कभी खुशी कभी गम असा माहोल असणार आहे. याला कारण आहे एलिमिनेशन. आज बिग बॉसच्या घरातील पहिलं-वहिलं एलिमिनेशन पार पडणार आहे. 

 

 

या एलिमिनेशनसाठी सुरेखा कुडची, तृप्ती देसाई, दादुस आणि अक्षय वाघमारे यांचं नॉमिनेशन झालं आहे. तर महेश यांनी काल सांगितल्या प्रमाणे  विशाल आणि स्नेहा हे सदस्य सेफ झाले आहेत. आजच्या चावडीवर मीनल आणि गायत्री आमने-सामने येणार आहेत. तर वाईल्ड कार्ड एंट्री म्हणून आदिश वैद्य येण्याची शक्यता बोलली जात आहे. एकंदरीत आजची चावडी रंगतदार होणार हे नक्की. 

 

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive