By  
on  

बिग बॉस मराठी 3: आदिश जयला म्हणाला, 'मला फालतू एटिट्यूड द्यायचा नाही..बॉडी वगैरा दुस-यांना दाखवायची'

बिग बॉस मराठीच्या घरामधून काल एक सदस्य घराबाहेर पडला तर एका नवा सदस्याची एंट्री झाली. काल अक्षय वाघमारेला घराबाहेर पडावे लागले आणि कालच  बिग बॉस मराठीमध्ये  सिझनची पहिली वाईल्ड कार्ड एंट्री झाली.  आदिश घरामध्ये जाणार आहे. पण, त्याआधीच बिग बॉस त्याला एक कठीण असे कार्य सोपवणार आहेत. बिग बॉस आदिशला बहुमूल्य temptation स्वीकारण्याची सुवर्णसंधी देणार आहेत आणि ते temptation आहे पॉवर कार्ड. या पॉवरद्वारे घरातील कोणता सदस्य कोणते काम करणार याची विभागणी करण्याचा अधिकार आदिशकडे असणार आहे. ज्यामुळे दिवसभरातील कारभारावर आदिशचं वर्चस्व असेल. पण आता हे temptation स्वीकारल्यास परिणाम स्वरूप या पॉवर कार्डची किंमत घरातील सदस्यांना मोजावी लागणार आहे.

आदिश पॉवर कार्डचा स्वीकार करणार आहे. बिग बॉसच्या पुढील आदेशापर्यंत घरातील तीन सदस्यांना रात्रभर जागून घराचे पहारेकरी बनावे लागणार आहे.त्यातच बिग बॉसच्या घरातील  एक सनसनाटी प्रोमो नुकताच  बाहेर आला आहे. यात आदिश जयसोबत जबरदस्त भांडताना पाहायला मिळतोय. आदिश यात जयला बोलतोय, मला फालतू  एटिट्यूड द्यायचा नाही..बॉडी वगैरा दुस-यांना दाखवायची...बिग बॉस  तुम्हाला सांगतोय पुन्हा हा जर जवळ आला तर सगळे रुल्स गेले उडत ' कुठल्यातरी टास्कदरम्ययान त्यांच्यात जबरदस्त जुंपल्याचं पाहायला मिळतंय. 

 

 

आदिशच्या एकूणच वागण्यावरुन तो कानामागून आला आणि तिखट झाला, या म्हणीप्रमाणेच वागतोय. सर्वांनाच आजच्या भागाची प्रचंड उत्सुकता ालगून राहिली आहे. तसंच तो ए ग्रुपच्या सदस्यांसोबत जाणार की बी ग्रुपच्या हे पाहणं सुध्दा रंजक ठरणार आहे. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive